अादेश डावलून मंचावर फटाके फ़ोडल्यानेच मेक इन इंडिया मंचावर अाग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अादेश डावलून मंचावर फटाके फ़ोडल्यानेच मेक इन इंडिया मंचावर अाग

Share This
मुंबई / www.JPNnews.in 
मुंबई गिरगाव चौपाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या मंचावर फायर क्रॅकर अाणि कलरफुल फ्लेम्स यांचा वापर करण्यात येऊ नये, अशी सूचना मुंबई अग्निशमन दलाने दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करत आयोजकांनी कार्यक्रमावेळी व्यासपीठावर फायर क्रॅकरचा वापर केला होता. तेच क्रॅकर रविवारी गिरगाव चौपाटीवर रविवारी लागलेल्या अागीचे मुख्य कारण असल्याची माहिती अाता पुढे येत अाहे. ढिसाळ कारभारामुळे आग लागली असताना या आगीची जबाबदारी ढकलण्यात सरकार आणि आयोजकांनी सुरुवात केली आहे.  

गिरगाव चौपाटी ही कलेक्टर लँड आहे, त्यामुळे महापालिकेने तेथे व्यासपीठ उभारण्यास परवानगी देण्याचा प्रश्न नव्हता. मात्र महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या आयोजकांनी या व्यासपीठाचे मुंबई अग्निशमन दलाकरवी फायर आॅडिट करवून घेतले होते. ‘ना हरकत’ वेळी अग्निशमन दलाने घातलेल्या अटींमध्ये फायर क्रॅकर अाणि कागदाचे तुकडे उडवणारे कलरफुल फ्लेम्स वापरले जाऊ नयेत, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते. मात्र अायाेजकांनी या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अाणि अाग भडकण्यास हेच कारण कारणीभूत ठरले. व्यासपीठावर एलपीजी सिलिंडर होते. त्यावर ठिणगी पडून स्फोट झाला अाणि काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. व्यासपीठ बनवण्यासाठी अत्यंत ज्वलनशील असे लाकडी अाणि कापडी सामान वापरण्यात आले होते. त्यामुळेसुद्धा आगीची व्याप्ती वाढली, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी 'दिव्य मराठी’ला दिली. व्हीव्हीआयपींचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात अग्निसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित होती, मात्र त्यात ढिसाळपणा झाल्याचे उघड होत अाहे.

दाेषींचे निलंबन हाेण्याची शक्यता
>अग्निशमन दल या प्रकरणाचा अहवाल तयार करत आहे. बुधवारी ताे अहवाल तयार होईल, त्यामध्ये नेमके कारण पुढे येईल. 
>आयोजकांनी अग्निशमन दलाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. 
>अग्निशमन दलाने फायर आॅडिट केले, मात्र वेळोवेळी त्याचे परीक्षण केले नाही, त्याबाबत दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन हाेण्याची शक्यता.

जबाबदारी काेणाची? सर्वांनीच झटकले हात
गिरगाव चाैपाटीवरील लागलेल्या अागीची जबाबदारी नेमकी काेणाची? यावरून सर्वच सरकारी यंत्रणांनी अापापले हात झटकण्यास सुरुवात केली अाहे. मेक इन इंडिया कार्यक्रमात उद्योग विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव यांच्यासह पाेलिस, महापालिका यांचाही सहभाग अाहे. मात्र या विभागांनी अाता टाेलवाटाेलवी सुरू केली अाहे.

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उद्योग विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा तसेच महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते अधिकारी कार्यक्रमात व्यस्त हाेते. अतिरिक्त सचिव के.पी. बक्षी यांनी ‘प्रेशर सिलिंडरमुळे फटाक्यांना आग लागली’ एवढेच सांगितले. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी विझ क्राफ्ट या कंपनीला देण्यात आली होती. त्यांनीही अाम्ही सर्व काळजी घेतली हाेती, असे सांगितले. तर शाॅर्ट सर्किटचा संशय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages