महापालिका आयुक्तांनी केली देवनार डंपींग ग्राऊंडची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2016

महापालिका आयुक्तांनी केली देवनार डंपींग ग्राऊंडची पाहणी

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार क्षेपणभूमी येथे लागलेली आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहेक्षेपणभूमी वरील केवळ दोन ते तीन ठिकाणी काही प्रमाणात धूर येत आहेसदर दोन ते तीन ठिकाणी कच-याखाली काही प्रमाणात असणार आगीची संभाव्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान दिवस-रात्र कार्यरत आहेतआज महापालिका आयुक्तांनी देवनार क्षेपणभूमी परिसराची (देवनार डंपींग ग्राऊंडपाहणी केल्यावर भविष्यात अशी घटना घडू नयेयासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत.


क्षेपणभूमी वरील विविध भागात जाण्यासाठी वाहन जाण्यायोग्य रस्ता नसल्याने अग्निशमन दलाची वाहने क्षेपणभूमी वर सहजपणे जाण्यास अडथळे येत होतेही बाब लक्षात घेऊन देवनार क्षेपणभूमी वर 'डेब्रिजचा वापर करुन गाडी जाण्यायोग्य रस्ता तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी घन कचरा व्यवस्थापन खात्यास दिल्या आहेतसुरुवातीला प्राथमिक स्वरुपातील रस्ता 'डेब्रिजचा वापर तयार करुन करण्यात यावा व त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अभियंता (रस्तेयांनी सुधारित स्वरुपातील रस्ता तयार करावाअसेही आयुक्तांनी आदेशित केले आहे.

देवनार क्षेपणभूमी वर सध्या महापालिकेद्वारे ३६ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेतही संख्या वाढवून आता १०३ इतकी करण्याबाबत आदेश दिले आहेततसेच क्षेपणभूमी वर संबंधितां शिवाय कुणालाही प्रवेश न देण्याबाबत कडकपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेततसेच सुरक्षाविषयक दृष्टीकोनातून स्थानिक पोलिसांशी नियमित संपर्क ठेवावा व आवश्यकतेनुसार मुंबई पोलीसांचे सहकार्य घ्यावेअशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिल्या आहेतअग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये देवनार पशुवधगृह सोबत आता`राष्ट्रीय केमीकल व फर्टीलायझर येथूनही पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

क्षेपणभूमी वर `मॅग्नेशियम क्लोराईड फवारल्यास आगीस प्रतिबंध होऊ शकतो अशी माहिती `निरीचे संचालक राकेश कुमार यांनी दिलीत्यानुसार महापालिकेच्या एम पूर्व विभागाने मुंबई अग्निशमन दलास १०० किलो इतक्या प्रमाणात`मॅग्नेशियम क्लोराईडउपलब्ध करुन द्यावे व ते अग्निशमन दलाने क्षेपणभूमीवर प्रायोगिक स्तरावर फवारावे असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आजच्या पाहणी दौ-यादरम्यान दिले आहेत .

Post Bottom Ad