दादर स्टेशनवर टीसीची प्रवाशाला मारहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दादर स्टेशनवर टीसीची प्रवाशाला मारहाण

Share This
MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016- 
मुंबईतील रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा तिकीट चेकरची गुंडागर्दी समोर आली आहे. दादर स्टेशनवर टीटी नरेश कुमार यांनी एका प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

टीटी नरेश कुमार यांची गुंडागर्दी एका प्रवाशाने  मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. नरेश कुमार यांनी दोन प्रवाशांना पकडून कानशिलात लगावल्या. त्यानंतर त्यांचे कॉलर पकडून तिकीट चेकिंग रुममध्ये फरफटत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं.दरम्यान, सध्यातरी याप्रकरणाची अधिकृत तक्रार कुठेही दाखल झालेली नाही.
नरेश कुमार हरियाणाचे आहेत. त्यांनी पंजाबच्या कबड्डी संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. यापूर्वीही नरेश कुमार आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुंबईतच हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनवर सीबीआयच्या टीमवरही हल्ला केला होता.  त्यावेळी तीनही टीसींना दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
दादर-मध्य रेल्वे मार्गावर 52 टीसींचा स्टाप आहे. मात्र बहुतेक टीसी हे ड्रेसकोड तसंच नेमप्लेट, बॅचशिवाय वावरत असतात. मात्र रेल्वेने याबाबत नियमावली जारी केली असतानाही, त्याचं उल्लंघन होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages