संत गाडगे बाबा  ग्रामस्वच्छता अभियान पुर्ववत सुरु न केल्यास तीव्र आंदोलन.- धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संत गाडगे बाबा  ग्रामस्वच्छता अभियान पुर्ववत सुरु न केल्यास तीव्र आंदोलन.- धनंजय मुंडे

Share This
मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
स्व.आर.आर.पाटील यांनी सुरु केलेले संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान स्व.आबांच्या 16 फेब्रुवारी या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनापुर्वी पुर्ववत सुरु न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

याबाबत ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी काल हे अभियान स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्यावर जनतेचा विश्वास ऩाही .सरकारने भंपक आणि तथाकथित चमत्कारी बुवा, बाबांच्या नादी लागण्यापेक्षा खरे संत असणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांची आणि कृतींची कास धरावी असा सल्ला देतानाच ही योजना बंद का केली याची कारणे चमत्कारीक आणि संतापजनक असून अंमलबजावणी करणाऱ्या संबधित यंत्रणाना कळवून देखील प्रशासनाने या योजनेची अमंलबजावणी केली नाही याचाच अर्थ प्रशासन सरकारच्या आदेशाला जुमानत नसल्याची,मंत्र्याची प्रशासनावर पकड नसल्याचे सिध्द होत आहे. सन 2014-15 प्रक्रिया न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करतानाच सरकारला या योजनेचे नाव बदलून संघाच्या कोणा नेत्याच्या नावे ही योजना सुरु करायची आहे की काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला..

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages