उल्हासनगर पालिकेचे उपायुक्त भदाणे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उल्हासनगर पालिकेचे उपायुक्त भदाणे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Share This


उल्हासनगर http://www.jpnnews.in - 
उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा प्रयत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवराज भदाणे लगेच कारमधून बाहेर पडल्याने त्यांना काही इजा झालेली नाही. भदाणे यांची गाडी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास भदाणे हे कारमध्ये बसले असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलनं कार पार्किंगच्या आवारात आले आणि पेट्रोलनं भरलेली बाटली कारवर टाकून आग लावली. भदाणे यांनी तात्काळ कारमधून पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला. महापालिकेच्या आवारातच अशी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages