संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार २०१६ करीता आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार २०१६ करीता आवाहन

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
बृहन्मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील ५ व्यक्तींना त्यांनी आजतागायत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रिडा, आर्थिक विकास तसेच चर्मकारांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रु.५,००१/- असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. मुंबईतील रहिवाशी चर्मकार बांधवांमधून ५ व्यक्तींना मुंबईच्या महापौरांच्या शुभहस्ते पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. त्याकरीता समाजातील सामाजिक कार्य करणाऱया व्यक्तींना आपला कार्यअहवाल कागदपत्रांसह पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


हा पुरस्कार संत रोहिदास महाराजांच्या ६३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. तरी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अर्ज त्यासोबत दोन फोटो, जातीचा दाखला, कार्यअहवाल, गुन्हेगार नसल्याचे प्रतिज्ञापत्र, समाजातील नोंदणीकृत संघटनेच्या शिफारसपत्रासह महापौर कार्यालय, मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, मुंबई ४००००१ यांचेकडे गुरुवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले आहे. 

अर्जदार चर्मकार समाजाचा असावा व त्याचे वय ५० वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच पुरस्काराकरीता उपरोक्त निकष ठरविण्यात आले असून त्याची पूर्तता करणे आवश्यक असेल. अधिक माहितीकरीता समन्वय समिती सदस्य डॉ. शांताराम कारंडे (९८२०१५८८८५), राजेश खाडे (९८२१६५५५७८), सुभाष आंबोकर (९९६९२३७७७१), उमाकांत डोईफोडे (९७०२९१३५५३) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages