कॉंग्रेसची संजय निरुपम यांना क्‍लीन चिट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉंग्रेसची संजय निरुपम यांना क्‍लीन चिट

Share This
मुंबई /  JPN NEWS www.jpnnews.in 
मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना कॉंग्रेसश्रेष्ठींनी क्‍लीन चिट दिली आहे. कॉंग्रेस संदेश या पक्षाच्या मुखपत्रात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू; तसेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासंबंधात छापलेला मजकूर अनावधानाने छापला गेला होता हे स्पष्टीकरण पक्षाने ग्राह्य धरले आहे. भविष्यात अशी चूक करू नका, अशी तंबी तेवढी यासंदर्भात दिली गेली आहे.



शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या निरुपम यांचे उत्तर भारतीय समुदायातले काम लक्षात घेता महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यात निरुपम यांना अभय मिळणार हे जवळपास निश्‍चित झाले होते. बाहेरून आलेल्या व्यक्‍तीला थेट अध्यक्षपद दिल्याने नाराज असलेल्या निष्ठावंत कॉंग्रेसजनांना या अभयामुळे धक्‍का बसला आहे. गांधी- नेहरू घराण्यावर झालेली टीका माफ करणे हा प्रकार आक्षेपार्ह आहे. मात्र, श्रेष्ठीनीच अशी भूमिका घेतल्यामुळे करणार तर काय, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली जाते आहे. या नाराजांमध्ये कामत गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages