स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मुंबई महापालिकेला घोषित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मुंबई महापालिकेला घोषित

Share This
मुंबई / www.JPNnews.in
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रदान करण्यात येणारा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मुंबई महापालिकेला घोषित झाला आहे़. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे़ यामुळे सर्व स्तरांत स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे़ यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविणाऱ्या संस्था, नगरपालिका, महापालिका, पंचायत स्तरांवरील सर्व ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येत आहे़

केंद्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई शहराचे स्वच्छतेविषयीचे योगदान निकषानुसार कौतुकास पात्र असल्यामुळे या पुरस्काराने पालिकेला गौरविण्यात येणार आहे़ गेल्या महिन्यात केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव प्रवीण प्रकाश यांनी मुंबई महापालिकेला भेट दिली होती़ या भेटीत त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेताना पालिकेला काही सूचना केल्या होत्या़ या सूचनांचा पाठपुरावा करीत पालिकेने पुरस्कार मिळवला आहे़ 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages