हार्बर मार्गावर लोकल १२ डबा करण्यास जून महिना उजाडणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हार्बर मार्गावर लोकल १२ डबा करण्यास जून महिना उजाडणार

Share This
मुंबई /  JPN NEWS www.jpnnews.in 
हार्बर मार्गावर १२ डबा लोकलसाठी आवश्यक असणारी प्लॅटफॉर्मची आणि अन्य तांत्रिक कामे फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात येणार असली तरी या मार्गावर सर्व लोकल १२ डबा करण्यास जून महिना उजाडणार आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यापर्यंत हार्बरवर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परावर्तनही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हार्बरवर १२ डबा लोकलचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्राधान्य दिले जात आहे. या कामासाठी सीएसटी स्थानकात हार्बरच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे तसेच रुळांचे किरकोळ काम ११ फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री ३ ते ४ तास चालणार आहे. हे काम पूर्ण होताच १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे मुख्य काम केले जाणार असून, या कामासाठी सीएसटी ते वडाळादरम्यानची लोकल सेवा बंद ठेवली जाईल. सध्या हार्बर मार्गावर ९ डब्याच्या ३६ लोकल धावत असून, त्याच्या ५३६ फेऱ्या होतात. मध्य रेल्वेने केलेल्या नियोजनानुसार ९ डब्यांच्या ३६ लोकलपैकी २0 लोकल एप्रिलपर्यंत १२ डबा केल्या जातील. त्यानंतर मे अखेरपर्यंत आणखी १० लोकल १२ डबा लोकलमध्ये परावर्तीत केल्या जाणार आहेत व शेवटी उर्वरित ६ लोकल १५ जूनपर्यंत १२ डबा होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकलसाठी आवश्यक असणारी प्लॅटफॉर्मची आणि अन्य तांत्रिक कामे फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात येणार असली तरी या मार्गावर सर्व लोकल १२ डबा करण्यास जून महिना उजाडणार आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यापर्यंत हार्बरवर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परावर्तनही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
हार्बरवर १२ डबा लोकलचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्राधान्य दिले जात आहे. या कामासाठी सीएसटी स्थानकात हार्बरच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे तसेच रुळांचे किरकोळ काम ११ फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री ३ ते ४ तास चालणार आहे. हे काम पूर्ण होताच १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे मुख्य काम केले जाणार असून, या कामासाठी सीएसटी ते वडाळादरम्यानची लोकल सेवा बंद ठेवली जाईल. सध्या हार्बर मार्गावर ९ डब्याच्या ३६ लोकल धावत असून, त्याच्या ५३६ फेऱ्या होतात. मध्य रेल्वेने केलेल्या नियोजनानुसार ९ डब्यांच्या ३६ लोकलपैकी २0 लोकल एप्रिलपर्यंत १२ डबा केल्या जातील. त्यानंतर मे अखेरपर्यंत आणखी १० लोकल १२ डबा लोकलमध्ये परावर्तीत केल्या जाणार आहेत व शेवटी उर्वरित ६ लोकल १५ जूनपर्यंत १२ डबा होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages