मुंबई काँग्रेसतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त 'जल्लोष २०१६' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई काँग्रेसतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त 'जल्लोष २०१६'

Share This

मुंबई / प्रतिनिधी =  मुंबई काँग्रेसतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त 'जल्लोष २०१६' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली रविवारी १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर पूर्व मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.

'जल्लोष २०१६' या कार्यक्रमात कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, कवी, लेखक व मराठीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रवीण दवणे, लोकसत्ताचे माजी वृत्तसंपादक रमेश झवर, प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप धीवर हे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती असतील. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित नृत्यागीतांचा सदाबहार नजराणा या सोहळ्यात पेश केला जाईल. गायक अभिजित कोसंबी व गायक रोहीत राउत यांची गाणी, त्याचबरोबर नृत्य कलाकार व अभिनेत्री दिपाली सय्यद आणि नृत्य कलाकार अश्विनी कासार यांच्या नृत्यगीतांचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल. तसेच विनोदी कलाकार व कॉमेडीची बुलेट ट्रेनचे कॉमेडी किंग अरुण कदम आणि कॉमेडी क्वीन आरती सोलंकी यांचा हास्यविनोदांचा मनोरंजक कार्यक्रम देखील सादर करणार आहेत.
'जल्लोष २०१६' या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते नारायण राणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार प्रिया दत्त, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, मनपा विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages