Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आजपासून मुंबईत बाबासाहेबांच्या विचारांचा भव्य महोत्सव

• एमएमआरडीच्या मैदानावर नेत्रदिपक सोहळा
अभिनेते अमीर खान, एस्सेल गू्रपचे सुभाष चंद्रा, प्रसिद्ध गायक हरीहरन, संगीतकार अन्नू मलिक, अड. प्रकाश आंबेडकर, डॉ. हर्षदीप कांबळे डॉ. सुखदेव थोरात यांची प्रमुख उपस्थिती 
• राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावंरील मान्यवर होणार सहभागी
• तीन दिवसांच्या नेत्रदिपक महोत्सवात भरगच्च कार्यक्रम, चर्चासत्र
• शॅडो शो, थ्रीडी शोसह हरीहरन यांचे खास गायनातून अभिवादन
मुंबई ८ एप्रिल :  भारतीय राज्यघटनेचे निर्माते, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांच्या विचारांचा भव्य व नेत्रदिपक असा तीन दिवसांचा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महामहोत्सवाची सुरूवात शनिवारी, ९ एप्रिलपासून मुंबईतील एमएमआरडी मैदान, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. या ऐतिहासिक अशा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमीर खान, एस्सेल ग्रूपचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते होणार आहे. 

हा उद्घाटन सोहळा आयडीबीआयचे संचालक मा. किशोर खरात, प्रसिद्ध गायक हरीहरन, बाँबे स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आशिष चौहान, डॉ. हर्षदीप कांबळे, संगीतकार अन्नू मलिक, गीतकार व संगीतकार मिलिंद जोशी,  युजीसीचे माजी संचालक डॉ. सुखदेव थोरात, भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अड. प्रकाश आंबेडकर रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या सोहळ्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावंरील मान्यवर होणार सहभागी

राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीकडून आयोजित करण्यात येणाºया या तीन दिवसांच्या महामहोत्सवाच्या पहिल्या दिवशी एमएमआरडीएच्या मैदानावर मानवातावादी विचारला समर्पित असलेल्या आवाज इंडिया टीव्ही या चॅनेलचा लोकार्पण सोहळाही अभिनेते  अमीरखान आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. 

महोत्सवाचे खास आकर्षणया भव्य महोत्सवात एकाच वेळी ५० व्हायोलिन वादक हे व्हायोलिन वाजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. तर देशात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ‘शॅडो शो’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय दिपाली सय्यद नृत्य सादर करणार आहेत. त्याच सोबत बाबासाहेबांच्या विचार आणि संदेशांवर आधारीत एक भव्य असा थ्रीडी शोही येथे दाखविण्यात येणार असून हा शो एकाच वेळी हजारो प्रेक्षकांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रख्यात गायक हरीहरन यावेळी बाबासाहेबावर अभिवादन करणारे गायन यावेळी करणार आहेत अशी माहिती राष्टनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने अमन कांबळे यांनी दिली.  

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, परिसंवादरविवारी, १० एप्रिल रोजी या भव्य महोत्सवात सकाळी ११ ते २ यावेळात यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादाचे प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचे प्रो. विवेककुमार, विशेष अतिथी म्हणून ‘पुण्यनगरी’च्या संपादिका राही भिडे, मी मराठीचे संपादक रविंद्र आंबेकर आणि आवाज इंडिया टीव्हीचे कार्यकारी संचालक अमन कांबळे हे आपले विचार मांडणार आहेत. तर या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल असतील.

दुपारचे सत्र २.३० ते ५.३० या दरम्यान असून यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाजरचना’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. सुरेश माने, एम.एस. बहल(युके), ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव, इन्कम टॅक्सचे कमिशनर सुबचन राम हे आपले विचार मांडतील.

रविवारी तिसरे सत्र हे शिवाजी नाट्यमंदीर दादर येथे सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात भूषवतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून गौतम चक्रवर्ती(युके), मल्कियत सिंग बहल(लंडन), अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, इन्कम टॅक्सचे सह आयुक्त कैलाश गायकवाड हे आपले विचार मांडतील

सोमवारी तिसऱ्या दिवशी या महोत्सवाची सुरूवात ही किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ७ वाजता होईल. ‘राष्ट्रनिर्माते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील परिसंवादाने होईल. यात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, अतिरिक्त आयुक्त कैलाश पगारे, सी.एल. थूल उपस्थित राहणार आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom