आराखड्यात सुचवलेले बदल न केल्यास शिवसेनेचा आराखड्याला विरोध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आराखड्यात सुचवलेले बदल न केल्यास शिवसेनेचा आराखड्याला विरोध

Share This
प्रस्तावित विकास आराखड्या संदर्भात शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट 
मुंबई / प्रतिनिधी : 24 May 2016
मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही तरतुदींमुळे मुंबईकरांच्या विकासाला बाधा निर्माण होणार आहे. या संदर्भात शिवसेनकडून पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून प्रस्तावित विकास आराखड्यात काही सूचनाद्वारे बदल सुचविले आहेत. सदर सूचनांचा समावेश येणाऱ्या विकास आराखड्यात झाला नाही तर या विकास आराखड्यास शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जाईल असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे. 

सदर प्रस्तावित विकास आराखड्यात परवडणाऱ्या घरांसाठी ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जमिनी, मिठागराच्या मोकळ्या जमीन तसेच आरे पट्ट्यातील हरित जमीन वापरण्यास शिवसेनेचा विरोध असेल या ऐवजी मुंबईतील जुन्या चालींना हॉटेल प्रमाणे वाढीव एफएसआय मिळाल्यास स्वस्त घरांच्या  योजनेस मोकळ्या भूखंडांना हात न लावता चालना मिळू शकेल असे विश्वासराव यांनी सांगितले. मुंबईतील मोकळ्या जमिनींचे प्रमाण  पातळीवर दर माणशी ४ चौ.मी. प्रस्तावित केलेले आहे ते वाढविण्यासाठी यांनी स्पष्ट केले. या साठीच शिवसेनेचा आरेच्या जागी मेट्रोच्या कारशेडलाही विरोध आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील विभागांचे जतन करा. मुंबईतील नद्या व खाड्यांचे संवर्धन झाले पाहिजे. इत्यादी सूचनाही शिवसेनेकडून केल्या गेल्या.
                 
विकास आराखड्यात चटई क्षेत्र निर्देशंकात केलेली वाढ भयावह असून त्या वाढीला मर्यादा न घातल्यास  सुविधांवरील ताण असह्य होईल अशी भितीही शिवसेनेकडून व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे कफपरेड येथे ३०० एकर क्षेत्रावरील समुद्र हटवून मध्यवर्ती उद्यानासाठी जागा उपलब्ध करण्याऐवजी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेवून सर्व सामान्य मुंबईकरांसाठी मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक उद्यान व विरुंगुला क्षेत्र निर्माण करण्याची मागणी केल्याच विश्वासराव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages