मुंबई / मुकेश श्रीकृष्ण धावडे, ता. 27
पालिका जी उत्तर विभागाच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत धारावीतील नालेसफाईचा मुद्दा चांगलाच गाजला. पावसाला तोंडावर असताना धारावीतल्या प्रभाग 179 मध्ये शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा सहायक अभियंता अजय चव्हाण यांनी केला होता. यावेळी पालिका जी उत्तर विभागाचे नामनिर्देशित सदस्य भास्कर शेट्टी यांनी अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला. आणि प्रभाग 179 मधील इंदिरा अण्णा नगर या अर्धा किलोमीटर लांबीच्या नाल्याची सफाई झालीच नाही असा दावा केला.
दरम्यान सहायक अभियंता अजय चव्हाण व भास्कर शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपली त्यामुळे वैतागलेल्या शेट्टी यांनी पालिका सहायक आयुक्त रमाकांत बिरादार तसेच प्रभाग समिती अध्यक्षांकडे प्रभाग 179 मधील इंदिरा अण्णा नगर मुख्य नाल्याला तात्काळ भेट देण्याची मागणी केली. भेटी दरम्यान आपले पितळ उघडे पडणार या भीतीने पालिका अधिकाऱ्याने आज सकाळपासूनच इंदिरा अण्णा नगर नाला साफ करण्यासाठी पालिका यंत्रणा लावल्याचे दिसून आले. सुमारे दोन ट्रक पेक्षा जास्त कचरा या नाल्यातून बाहेर काढण्यात आला. नाल्यातून निघालेला कचरा पाहून भेटीवर आलेल्या पालिका अधिकार्यांनी या कचऱ्याचे खापर आपल्या कनिष्ठांवर फोडले. आणि वाहत आलेला कचरा असल्याचे सांगत घटना स्थळावरून काढता पाय घेतला.
याबाबत पालिका जी उत्तर विभागाचे नामनिर्देशित सदस्य भास्कर शेट्टी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणले कि या घटनेमुळे पालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. पालिका अधिकारायांच्या कामाची पोलखोल झाली आहे. तरी पालिका सहायक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नाले सफाईकडे स्वतःजातीने लक्ष द्यावे अन्यथा झालेल्या अर्धवट नालेसफाईमुळे संपूर्ण धरावी पावसाच्या पाण्यात बुडणार आहे असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment