सत्ताधार्यांच्या भांडणात मुंबई जलमय होणार - प्रवीण छेडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सत्ताधार्यांच्या भांडणात मुंबई जलमय होणार - प्रवीण छेडा

Share This
मुंबई / प्रतिनिधी
पावसाला तोंडावर आला असताना मुंबईमधे नाले सफाई अद्याप योग्य प्रकारे झाली नसताना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. शिवसेना आणि भाजपामधील भांडणामुले नालेसफाईकड़े मात्र दुर्लक्ष होत असल्याने पावसाल्यात मुंबई जलमय होउन 26 जुलै सारखी परिस्थिती उध्भवू शकते असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी केला आहे.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून नालेसफाई योग्य रित्या झाली नाही आणि मुंबई तुंबली तर प्रशासन जबाबदार असेल असे म्हटले आहे. वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर अंकुश असावा लागतो असा अंकुश नसल्याने सत्ताधारी पक्ष आपली जबाबदारी झटकुन मुंबईकर नागरीकांच्या तोंडाला पाने फुसल्याचे छेडा म्हणाले.

महापालिकेच्या वास्तु व उपक्रमाचे उद्घाटन करून त्याचे ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष करून दाखवले म्हणून श्रेय घेते त्याच प्रमाणे सत्ताधाऱ्यानी नालेसफाईच्या कामातून सुद्धा पळ काढू नए. गेल्यावर्षी सत्ताधारी पक्षानी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून स्वताची पाठ थोपटून घेतली होती. भाजपानेही नालेसफाईबाबतची जबाबदारी शिवसेनेवर ढकलली होती याचा छेडा यांनी निषेध केला आहे. नालेसफाईबाबत सत्ताधारी पक्षाने आपली जबाबदारी प्रशासनावर ढ़कलली असली तरी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून नालेसफाई कामाची पाहणी करून नाले सफाईची पोल खोल करणार असल्याचे छेडा यांनी सांगितले.

सत्ताधारी क्रेडीटच्या मागे 
पालिकेच्या वास्तुंचे अर्धवट काम करून उद्घाटन  करत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा श्रेय घेत असते. जोगेश्वरीच्या ट्रोमा सेंटर मधे असाच प्रकार झाला. ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचे काम अर्धवट असताना त्याचे उदघाटन करण्याचा घाट घातला जात आहे. आज वरळी येथील बेस्टचा भूखंड ताब्यात नसताना महाव्यवस्थापक आणि भाजपाचे बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मीठबावकर याना विश्वासात न घेता डेपोचे शिवसेनेने उद्घाटन केले आहे. हे प्रकार म्हणजे कामे अपूर्ण असताना श्रेय लाटण्याचे आहेत असे छेडा म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages