मुंबई / प्रतिनिधी / दि. २८
मुंबईत एकाच कुटुंबातील व्यक्ती किंवा एकाच व्यक्तीचे किती ठिकाणे आणि योजनांना नाव देण्यात यावे याबाबत महापालिकेने मर्यादा निश्चित कराव्या अशी अपेक्षा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलतना व्यक्त केली.
एकाच व्यक्ती आणि कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने विविध शासकीय योजनांना आणि स्थळांना नावे देण्याबाबत अभिनेते ऋषी कपूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याचे समर्थन करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, या देशातील स्वातंत्र सैनिक व देशासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तीं आणि समाजधुरीणांचा सन्मान राखला जावा अशीच आमची भूमिका आहे. पण मुंबईसारख्या शहरामध्ये चौक, रस्ते, वास्तू आणि योजनांना एकाच व्यक्ती अथवा एकाच कुटुंबातील व्यक्तींचे कितीवेळा नाव द्यावे याची काहीतरी मर्यादा असायला हवी. ही मर्यादा महापालिकेने निश्चित करण्याची गरज आहे. आणि त्या बाबात महापालिकेत चर्चाही होण्याची गरज आहे. त्यामुळे नाव देताना सर्वच समाज घटकांचा सन्मान व्हावा अशी प्रतिक्रिया आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही कुटूंबियांची नावे घेऊन प्रतिक्रिया विचारली असता आमदार अॅड.आशिष शेलार यांनी कोणत्याही कुटूंबियांचे अथवा व्यक्तिचे नाव न घेता आपण कुठल्याही कुटूंबाचे अथवा व्यक्तिवर बोलत नसून शहराच्या व समाजासाठी सकारात्मक दृष्टीने काम करणाऱ्या सर्वांचाच सन्मान व्हावा या भावनेतून बोलत आहोत असेही स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment