पनवेलमध्ये नवीन रेल्वे टर्मिनस येत्या तीन वर्षांत उभारण्यात येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पनवेलमध्ये नवीन रेल्वे टर्मिनस येत्या तीन वर्षांत उभारण्यात येणार

Share This
मुंबई : मुंबईकरांची ट्रेन पकडण्यासाठी एलटीटी किंवा सीएसटीपर्यंत पायपीट करावी लागत होती. मात्र आता ही पायपीट थांबणार असून, पनवेलमधूनही मेल-एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी पनवेलमध्ये नवीन रेल्वे टर्मिनस येत्या तीन वर्षांत उभारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. सोमवारी परेल टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसचा कोनशिला समारंभ सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांच्यासह मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर इत्यादी लोकप्रतिनिधी, अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पनवेलमध्ये मेल-एक्स्प्रेससाठी टर्मिनस उभारतानाच कोचिंग टर्मिनस बांधले जाईल. पनवेल टर्मिनससाठी १५४ कोटींचा खर्च असून, येत्या तीन वर्षांत ते बांधले जाईल. यात तीन प्लॅटफॉर्म असतील आणि येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतील, असे ते म्हणाले. कोचिंग टर्मिनसमध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्या विकासाकडे केंद्राकडून विशेष लक्ष दिले जात असून, रेल्वेसाठी केंद्राकडून तसेच राज्याकडून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जात असल्याचे सांगितले. मुंबई रेल्वेचा विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हा विकास करताना आणखी काही प्रकल्प येत्या काळात सुरू केले जाणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. दादर स्थानकावर पडणारा ताण पाहता लोकलसाठी परेल टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. परेल हे एकेकाळी शेवटचे ठिकाण मानले जात होते. मात्र आता यावरही भार वाढत असून, त्यासाठी टर्मिनसची गरज भासत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. हे पाहता परेल टर्मिनस उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५१ कोटी रुपये खर्च असून, तीन वर्षांत ते बांधले जाईल. तीन प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, सब-वे बांधतानाच प्लॅटफॉर्मला रस्त्यांची थेट जोड दिली जाईल.
पनवेल ते कळंबोली अशी डेडिकेटेड लाइन बांधली जाईल. जेणेकरून यावरून देखभाल-दुरुस्ती व सफाईसाठी डबे आगारात पाठविण्यास मदत होईल. कळंबोलीमध्ये चार वॉशिंग लाइन, दोन स्टॅबलिंग लाइन आणि डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुविधा उभारण्यात येतील. हे टर्मिनस ३१ मार्च २0१९पर्यंत उभारले जाईल. च्एमयूटीपी-२मधील सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गातील परेल टर्मिनस हा एक भाग आहे. ८९१ कोटी रुपये या मार्गासाठी खर्च येणार असून, परेल टर्मिनससाठी ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परेल टर्मिनसमध्ये एक टर्मिनल लाइन बांधतानाच दोन्ही बाजूंना प्लॅटफॉर्म असेल. सध्याच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवितानाच पादचारी पुलाची रुंदीही वाढविली जाईल. क्यारोल रोल पुलावर असणाऱ्या पादचारी पुलाला दक्षिण दिशेला स्कायवॉक जोडला जाईल. एलिव्हेटेड तिकीट बुकिंग कार्यालय असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages