वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाचा 14459 कोटींचा प्रकल्प अहवाल मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2016

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाचा 14459 कोटींचा प्रकल्प अहवाल मंजूर

• एकूण लांबी 32.32 कि. मी.
• एकूण 32 स्थानके
• 30 हेक्टर जागेवर कार डेपो बांधणार
• या मार्गावर 6 डब्यांची एक मेट्रो दर 3 मिनीटांनी धावणार
• दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 8.70 लाख
• जुलै 2021 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष.

मुंबई, दि. 3 : मुंबई व लगतच्या शहरातील प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 मार्गाच्या 14 हजार 459 कोटींच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

            
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतामहापौर स्नेहल आंबेकररायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे,आमदार प्रकाश बिनसाळेबृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसेमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,महानगरपालिका आयुक्त अजोय मेहतामहानगर आयुक्त यु.पी.एस.मदानमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी,प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडेसंजय खंदारेअश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
            
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 मार्गाचा प्रकल्प अहवाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केला आहे. या प्रकल्पाची पूर्णत्वाची किंमत 14 हजार 459 कोटी  इतकी निश्चित करण्यात आली असून हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मेट्रो मार्गावर भक्ती पार्क मेट्रोवडाळा टी.टी. आणिक नगर बस डेपोसुमन नगर,सिध्दार्थ कॉलनीअमर महल जंक्शनगरोडिया नगरपंत नगरलक्ष्मी नगरश्रेयस सिनेमागोदरेज कंपनीविक्रोळी मेट्रो,  सूर्य नगरगांधी नगरनवल हाऊसिंगभांडूप महापालिकाभांडूप मेट्रोशांग्रीला मेट्रोशांग्रीलासोनापूरमुलूंड अग्निशामन केंद्रमुलूंड नाकातीन हात नाका (ठाणे)ठाणे आर.टी.ओ.महापालिका मार्गकॅडबरी जंक्शन,माजीवाडाकापूरबावडीमानपाडाटिकूजी-नी-वाडीडोंगरी पाडाविजय गार्डन,कासारवडवली अशी एकूण 32 स्थानके राहणार आहे.

या मेट्रो मार्गाची लांबी 32.32 कि. मी. इतकी राहणार आहे. या  मेट्रो मार्गासाठी  ओवाळे येथे 30 हेक्टर जागेमध्ये कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर या मार्गावर 6 डब्यांची मेट्रो दर 3 मिनीटांनी धावणार असून या मेट्रोची प्रवाशी क्षमता 1756 इतकी असणार आहे. तर प्रतिताशी प्रतिदिशा 28107 इतकी प्रवाशी संख्या असणार आहे. या मेट्रो मार्गावर सन 2021-22 मध्ये दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 8.70 लाख इतकी असेल. हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई व लगतच्या शहरातील प्रवाशांना कमी खर्चात व वेळेत सुखकर प्रवास करता येणार आहे.  या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यास त्याचबरोबर निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली. हा प्रकल्प अहवाल अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad