रस्ते घोटाला प्रकरणी खाजगी लेखापालाना 21 जून पर्यंत पोलिस कोठडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते घोटाला प्रकरणी खाजगी लेखापालाना 21 जून पर्यंत पोलिस कोठडी

Share This
मुंबई / प्रतिनिधी / 16 June 2016 - मुंबई महापालिकेमधील रस्ते घोटाला प्रकरणी बुधवारी ( 15 जून ) रात्री अटक करण्यात आली. आलेल्या थर्ड पार्टी ऑडिटर कंपनी मधील 10 खाजगी लेखापालाना किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांना 21 जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


मुंबईमधील रस्त्याच्या कामात घोटाले होत असल्याचे पत्र भाजपाच्या खासदार पूनम महाजन आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना दिले होते. या पत्राच्या अनुशंगाने आयुक्तानी चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीने कंत्राटदार, थर्ड पार्टी ऑडिटर आणि अधिकारी याना दोषी ठरवले होते. काही कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पालिकेने रस्त्याच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी एसजीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडियन रजिस्टर ऑफ़ शिपिंग या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. या कंपनीनी रस्त्याच्या कामाची नेमकी किती काम झाले याचे परिक्षण करून  प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना या थर्ड पार्टी ऑडीट करणाऱ्या कंपन्यानी जागेवर जाऊन पाहणी न करताच प्रमाणपत्र दिली आहेत.

हा प्रकार धोकाधडीचा असल्याने बुधवारी खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या ऑडीट कंपनी मधील संतोष कदम ( 42 ) अशफाक सय्यद (26) मिलिंद कुमावत (26) राकेश मेरवाडे (34) पवनकुमार शुक्ला ( 26) प्रेमानंद  धनावड़े (37) मंगेश तलेकर (33) धिरज फुलझेले ( 40) राहुल शिंदे (29) धैर्यशील पाटील (33) या लेखापालाना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी या 10 खाजगी लेखापालाना किल्ला कोर्टात हजर केले असता 21 जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages