व्यवसाय परीक्षेसाठी 27 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्यवसाय परीक्षेसाठी 27 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

Share This
मुंबईदि. 15 : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची 105 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा येत्या ऑक्टोबर 2016 मध्ये होणार आहे. या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना शुल्कासह आपला परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 27 जूनपर्यंत आहे. शिकाऊ उमेदवार व संबंधित आस्थापनांच्या मालकांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.


या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारांचे सविंदा / करारपत्र ज्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रात सादर केलेले आहेत्याच मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामध्ये 3व 3 ए या विहित नमुन्यात उमेदवारांची माहिती आस्थापनाच्या पत्रासह दिनांक 27 जून 2016 पर्यंत पाठवावी. आस्थापनांनी शिकाऊ उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र विहित केलेल्या नमुना – 4 मध्ये अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर परीक्षा केंद्रास पाठविण्यात यावी. परीक्षेस बसण्यास पात्र असणाऱ्या सर्व शिकाऊ उमेदवारांनी विहित नमुन्यात परीक्षा अर्ज व 550 रुपये शुल्क27 जून 2016 पूर्वी भरावेअशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

माजी खाजगी उमेदवारांनी विहित नमुन्यात ते ज्या परीक्षा केंद्रामधून अनुत्तीर्ण झाले असतील त्या परीक्षा केंद्रामध्ये 18 मे 2016पर्यंत परीक्षेचे अर्ज विहित नमुना आणि शुल्कासह सादर करावेत.

शिकाऊ उमेदवारांबरोबर खालीलप्रमाणे अटी पूर्ण करणाऱ्या नवीन खाजगी उमेदवार म्हणून परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या विहित नमुन्यांसाठी व सविस्तर माहिती पत्रकासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधून 25 जून 2016 पूर्वी अर्ज सादर करावेत.

या परीक्षेस बसण्यासाठी उमेदवार शिल्पकारागिर प्रशिक्षण योजने अंतर्गत संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण असावातसेच एन.टी.सी. नंतर एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 4 वर्ष व2 वर्षाच्या अभ्यासक्रमाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार कार्यरत असलेली आस्थापना शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत अथवा शासकीय / निमशासकीय उपक्रमांतर्गत कार्यरत असावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages