मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

Share This
मुंबई / प्रतिनिधी दि, 21 june 2016 - मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने येणा-या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. 


भायखळ्यापुढे लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विद्याविहार, ठाणे, विक्रोळी, भांडूप, कल्याण, डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काही प्रवाशांनी लोकलसेवा विस्कळीत झाल्याने पुन्हा घर गाठण्यास सुरुवात केली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर झाला आहे. मध्य रेल्वे रखडली असताना पश्चिम आणि हार्बर रेल्वेही उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वे वाहतूक अर्धा तास उशिराने धावत असून पश्चिम मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.  विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही जवळपास १५ मिनिटं उशीरानं धावत आहेत. 

रसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळून फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प

ठाणे -  उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे स्थानकातील फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीचा कठडा कोसळल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त असून तात्काळ ब्लॉक घेऊन संरक्षण भिंतीचं काम करण्यात यावे, अशी विनंती महापालिकेने मध्य रेल्वेच्या अधिका-यांकडे केपूली आहे. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages