माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच बँकांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सुविधा - सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच बँकांद्वारे ग्राहकांना दर्जेदार सुविधा - सुभाष देसाई

Share This
मुंबईदि. 16 : बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या डिजिटलायझेशनमुळे आज मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बँकिंग क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे  ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळत आहेअसे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.


कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय) च्या वतीने आयोजित ‘बँकिंग टेक समिट 2016’ च्या दहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योगमंत्री देसाई बोलत होते. भारतीय स्टेट बँकेच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्यसीआयआयचे चेअरमन अरुण जैनपीडब्ल्यूसी पार्टनर विवेक बेलगवीसीसीआय पश्चिम विभागाचे चेअरमन सुधीर मेहता यावेळी उपस्थित होते.
यावेळी देसाई पुढे म्हणाले कीमहाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून ई-गव्हर्नन्स (आपले सरकार) या पोर्टलद्वारे ऑनलाईन सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आयटी क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात आहे. तसेच ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी देसाई यांच्या हस्ते 2016 च्या बँकिंग अहवालचे प्रकाशन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages