मुंबई दि. १५: राज्यातील पीडित महिलांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोग अधिक सक्षम करण्यात येईल असे सांगतांना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हास्तरावर संवाद निर्माण करण्यासाठी आयोगाने यंत्रणा उभी करावी व खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे रहावे अशा सूचना दिल्या. मंत्रालयात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य महिला आयोगाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह आयोगाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
आयोगाच्या संगणकीकरणाला प्राधान्य देताना सायबर गुन्हे हाताळण्यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आयोगाने अभ्यासावे व उत्तमातील उत्तम तंत्रज्ञान स्वीकारून अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून महिलांची सोडवणूक करावी असे सांगून वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, महिला सक्षमीकरण आणि संरक्षणासाठी असलेले कायदे अधिक सुटसुटीत कसे करता येतील याचा अभ्यास आयोगाने करावा. त्यासाठी आयोगाला आवश्यक असलेले विधिज्ञ उपलब्ध करून दिले जावेत. आयोगाचे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये वित्तीय तरतूद, पदनिर्मितीचा देखील समावेश आहे. आयोगाने महिला व बालविकास सचिवांशी चर्चा करून त्यांच्या सर्व महत्वपूर्ण गरजांचा प्रस्ताव त्याच्या विश्लेषणासह वित्त विभागाकडे सादर करावा, त्यासाठी पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल.
No comments:
Post a Comment