मुंबईत तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्र फूल, कडूनिंब यासारखी झाडे लावा ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्र फूल, कडूनिंब यासारखी झाडे लावा !

Share This
गुलमोहरसोनमोहर, पर्जन्‍य वृक्ष लावणे टाळा महापालिकेचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी
पर्यावरणाच्या दृष्टीने तर वृक्षारोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहेया बाबी लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यात आपल्या मुंबई महापालिकेने १ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच नागरिकांना देखील आपल्या सोसायटींच्या परिसरात झाडे लावणे सोपे व्हावे यासाठी सवलतीच्या दरात झाडांची रोपे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता मुंबईतील मातीत रुजेलवाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहेतर मुंबईच्या मातीत घट्टपणे मूळ धरु न शकणारी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळणे देखील आवश्यक आहेही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत याची यादी नुकतीच जाहीर केली आहे.

बृहन्मुंबई परिसरात झाडे लावताना बहावा,तामणकरंजनागचाफासात्वीनबकुळ,समुद्रफूलपुत्रंजीवकडूनिंबउंबरकदंबपिंपळ,वावळशिशवबेहडाकांचनटवृक्ष यासारखी झाडे प्राधान्याने लावावीत असे आवाहन महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.  त्याचसोबत गुलमोहरसोनमोहर, पर्जन्‍य वृक्ष (रेन ट्री), जंगली बदामया सारखी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळावे असेही परदेशी यांनी नमूद केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages