रेल्वेच्या तिकिटांवर आता तोट्याचा उल्लेख - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेच्या तिकिटांवर आता तोट्याचा उल्लेख

Share This

मुंबई / प्रतिनिधी – सार्वजनिक परिवहन वाहतूक उपक्रम नेहमीच तोट्यात चालतात. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा दर किलोमीटरमागे मुंबईकरांकडून अवघे ११ पैसे भाडे आकारते. रेल्वेच्या सबसिडीमुळे हा प्रवास स्वस्त होतो. मात्र याची पुरेशी कल्पना सामान्य प्रवाशांना नसते. त्यामुळे उपनगरीय सेवेमुळे नेमका किती तोटा होतो त्याची माहिती प्रत्येक तिकिटावर छापण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. पश्‍चिम रेल्वेने त्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक तिकिटाच्या खाली तोट्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उपनगरीय लोकल सेवा चालवण्यासाठी रेल्वेला दररोज तोटा होतो. ही स्थिती केवळ उपनगरीय मार्गावर नसून लांबपल्ल्याच्या सेवेवरही आहे. त्यापैकी उपनगरीय मार्गावरील महसूल आणि खर्च यांची सांगड घातली असता रेल्वेस ३६ टक्के इतका महसूल मिळत असल्याने उपनगरीय सेवेवरील तोटा ६४ टक्के आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages