बाबासाहेब देत राहिले, नातू मात्र मागत राहिले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेब देत राहिले, नातू मात्र मागत राहिले

Share This
-रामदास आठवले यांची आंबेडकर बंधुंवर टिका
-सामोपचाराने तोडगा काढण्याचे केले आवाहन
मुंबई । प्रतिनिधी 29 June 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मिळकतीतून उभे केलेल्या संस्थांचे न्यास स्थापन करुन समाजाला कायम देत राहिले. मात्र त्यांचे प्रकाश, भीमराव आिण आनंराज हे तिन्ही नातू बाबासाहेबांच्या सर्व संस्थांमध्ये विश्वस्तपदासाठी कायम भांडत असून समाजाकडून केवळ मागत राहिले आहेत, म्हणूनच आंबेडकर बंधु समाजाच्या आदरास जराही पात्र नाहीत, अशी खरमरीत टिका करत दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद सामोपचाराने मिटवावा असे आवाहन रिपाइं अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

आंबेडकर भवन पाडकाम प्रकरणी आंबेडकर बंधु किंवा रत्नाकर गायकवाड यापैकी मी कुणाच्याही बाजूचा नाही. मात्र, आंबेडकर भवनाची इमारत धोकादायक होती. ती पाडणे आवश्यक होते. ती इमारत उध्वस्त केली नसून नवी इमारत बांधण्यासाठी ती पाडण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. 

आंबेडकर बंधुंना दादरच्या नव्या इमारतीत दुप्पट जागा द्यावी. आणि हा वाद सामोपचाराने मिटवावा. शेवटी वैयक्तीक स्वार्थापेक्षा समाजाच्या हिताचे येथे केंद्र उभे राहणार आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तो न देता नव्या इमारतीच्या बांधकामात आडकाठी आणणे दुर्दैवी असल्याचे आठवले म्हणाले.

आंबेडकरी जनतेने आंबेडकर भवन प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. हा विषय भावानीक करु नये. गेली साठ वर्षे या भूखंडावर काहीही होऊ शकलेले नाही. समाजाचे जाणते लोक आता येथे १७ माजली नवी इमारत बांधू पाहात आहेत. त्यामुळे नवी इमारत आंबेडकरी चवळवळीचे मध्यवर्ती केंद्र होईल. त्याचे आपण स्वागत करायला पाहिजे, असे अवाहनही आठवले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages