शिवसेनेच्या अनधिकृत बैनरबाजी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेच्या अनधिकृत बैनरबाजी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई विद्रूप करणाऱ्या ब्यानरबाजीवर कारवाई करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशा नंतर राजकीय पक्षानी ब्यानरबाजी करणार नसल्याचे शपथपत्र दाखल केले मात्र पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाच्या 50 व्या वर्धापन दिना निमित्त करण्यात आलेल्या बैनरबाजी विरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाने पोलीसाना दिले आहे.

सहाय्यक आयुक्त पत्रा मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की, मनपाच्या रस्त्यावर, पदथावर अनधिकृतपणे लावलेल्या जाहिराती विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपिकरण प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्याबाबत म्हटलेले आहे. विशेष म्हणजे बोरीवली येथील आर मध्य विभागाच्या अनुज्ञापन निरिकक्ष यांनी 14 जून रोजी अनधिकृत रित्या प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई केली होती. या बैनरबाजी मध्ये शिवसेना पक्षाच्या 50 वर्षाच्या समाजकारणाची मराठी माणसाच्या हक्काची, सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन अशा आशयाचे बैनर झळकावण्यात आलेले होते. बोरवली विभागात करण्यात आलेल्या बैनरबाजी मध्ये शिवसेना शाखा क्रमाक 15 चा उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात प्रदर्शित करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थे विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विदृपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 अधिनियम कलम 3 व 4 अन्वये कारवाई करावी असे पत्र  पालिकेच्या आर विभाग कार्यालयाने बोरीवली पोलिस ठाण्याला दिले आहे. या पत्रात सेनेने लावलेल्या ब्यानर विरोधात कारवाई करावी असे स्पष्ट म्हणताना आज्ञात व्यक्ति चा शोध घेऊन त्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages