जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत काँग्रेसमध्येच - प्रिया दत्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत काँग्रेसमध्येच - प्रिया दत्त

Share This
मुंबई, ६ जूनः प्रतिनिधी - 'जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत. आमचं कुटुंब नेहमी काँग्रेससोबत राहिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यासाठीच त्यांची भेट घ्यायला गेली होती. नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त फंड गोळा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्याची विनंती त्यांना करण्यासाठी भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनात वापरण्यासाठी चार फोटोही दिले आहेत', असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे. 

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण देत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. प्रिया दत्त यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रिया दत्त शिवसेनेते प्रवेश करुन काँग्रेसला धक्का देत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages