खडसे यांची एसआयटी मार्फ़त चौकशी करा - दामोदर तांडेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खडसे यांची एसआयटी मार्फ़त चौकशी करा - दामोदर तांडेल

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव - राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या अखत्यारीत नसताना पर्सियन नेट ट्रोलर्सधारकाना 12 नोर्टिकल माईलच्या बाहेर मच्छीमारी करण्याचे लायसंस देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. खडसे यांना 30 कोटीचा मलिदा मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे दामोदर तांडेल यांनी केला असून खडसे यांची एसआयटी मार्फ़त चौकशी करावी अशी मागणी तांडेल यांनी पत्रकार परिषदेत केली.


खडसे यांच्या बरोबर पर्सियन नेट ट्रोलार्स धारकांची बैठक झाली. या बैठकीत ससून डॉक मधील 700 ट्रोलार्सना मासेमारी परवाने देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी खडसे यांनी माझे निकटवर्तीय गजानन पाटील यांच्या सोबत बसून मसुदा तयार करा मी तुमचा प्रश्न सोडवतो असे खडसे यांनी सांगितले होते. यानंतर गजानन पाटील यांनी खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पर्सियन नेट ट्रोलार्सच्या प्रतिनिधी सोबत 5 बैठका घेतल्या व परवाने देण्यासाठी खडसे साहेबांना 15 कोटी रुपये द्यावे लागतील. एक कोटी रुपये टोकन दिल्यावर मसुदा तयार करण्यात येईल. सचिव मत्स्य व्यवसाय यांच्याकडे अधिसूचना काढण्यासाठी मसुदा जाईल तेव्हा 5 कोटी रुपये द्यावे लागतील आणि परवाने वितरीत करण्यात येतील तेव्हा राहिलेले 9 कोटी रुपये द्यावे लागतील असा सौदा झाल्याचा गौफ्यस्फोट तांडेल यांनी केला आहे.

12 नोर्टिकल पर्यंत मच्छीमारी करण्यास राज्य सरकार परवानगी देते. त्या पुढील परवानगी केंद्र सरकार देते. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली परवानगी देण्याचा घाट खडसे यांनी घातला आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पर्सियन धाराकांना मच्छीमारी करता यावी म्हणून तसा प्रस्ताव सचिव मत्स्यव्यवसाय याना सादर करण्यात आलेला आहे. या मसुद्यात 5 फेब्रुवारी 2016 मधे सोमवंशी कमिटीने दिलेल्या 25 शिफारशीतील काही अटी शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती खडसे यांच्या कार्यालयातूनच मिळाली आहे. खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात बैठक घेणाऱ्या गजानन पाटील याला लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात असल्याने खडसे यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी तांडेल यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages