विधी शाखेच्या ‘सीईटी’साठी अर्ज करण्यास तीन जूनपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधी शाखेच्या ‘सीईटी’साठी अर्ज करण्यास तीन जूनपर्यंत मुदतवाढ

Share This
मुंबईदि. 31 : सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विधी शाखेच्या (लॉ) तीन  व पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) अर्ज करण्याची मुदत 3 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. बारावी तसेच पदवी झालेल्या विद्यार्थ्यांनी विधी शाखेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावेतअसे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी केले आहे.

राज्य शासनाने विधी शाखेच्या तीन व पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून यंदा प्रथमच राज्यातील विधी महाविद्यालयात केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची शेवटची तारीख 25 मे 2016 होती. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्ज करण्याची तारीख3 जूनपर्यंत वाढविण्यात आली असून यानंतर अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही.  अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र दि. 9 जून 2016पासून संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज www.dhepune.gov.in अथवाhttp://www.mahacet.org या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन अर्जासाठी ही दोन्ही संकेतस्थळे या कालावधीत खुले करण्यात आले आहेत, असे श्री. ओक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages