मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिका स्वताच्या एम्बुलंस घेणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिका स्वताच्या एम्बुलंस घेणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी 13 June 2016
मुंबईकर नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. नागरीकांची एम्बुलंस मिळत नसल्याने महापालिकेने स्वताच्या एम्बुलंस विकत घ्याव्यात अशी मागणी करण्यासाठी पालिका आयुक्तांची भेट घ्यावी असे पालिकेच्या आरोग्य समितीमधे करण्यात आल्याची माहिती प्रशांत कदम यांनी दिली.


मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एम्बुलंस कमी दरात मिळत असत. परंतू शासनाची 108 क्रमांकाची सेवा सुरु झाल्याने पालिकेने स्वताच्या एम्बुलंस घेतलेल्या नाहित. शासनाच्या एम्बुलंस काही विभागापर्यन्तच जात असल्याने लोकाना याचा फायदा होत नसल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पालिकेच्या एम्बुलंस तासाला 50 रुपये दराने चालवल्या जात असल्याने लोकांना याचा नक्की फ़ायदा होऊ शकतो यमुले पालिकेने स्वताच्या एम्बुलंस घ्याव्यात अशी मागणी आरोग्य समितीमधे करण्यात आली. पालिकेच्या एम्बुलंस विकत घेण्यासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करावा म्हणून आयुक्तांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे असे कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages