उपनगरात उंदीर मारायाला पालिकेला कोणी मिळे ना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगरात उंदीर मारायाला पालिकेला कोणी मिळे ना

Share This
उपनगरात लेप्टोचा धोका ?
मुंबई / प्रतिनिधी 30 june 2016
गेल्या पावसाळ्यात मुंबईमधे लेप्टोस्पारेसिस रोगाने डोके वर काढले होते. लेप्टोचे सर्वात जास्त रूग्ण पश्चिम उपनगरात आढळले होते.यावेळी महापालिकेने स्वता घोषित केले होते पावसाच्या पाण्यात शक्यतो जाऊ नका. जखम उघडी असेल तर लेप्टोचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. चार पायाच्या सस्तन प्राण्याच्या मलमुत्रापासून लेप्टो फैलावत असल्याने यंदा तबेल्यावाल्याना स्वच्छता राखावी म्हणून नोटिस बजावली. मात्र लेप्टोचा फैलाव उंदरांमुले होत असताना याच उंदराचा नाहिनाट करताना उपनगरात पालिकेला अपयश येत आहे. त्यामुले उपनगरात लेप्टो फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबई शहरात उंदीर मारण्यासाठी पालिकेने ख़ास माणसे नेमली आहेत. उंदीर मारण्याचे काम रात्रीच्या वेळी चालते. शहरात सन 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 93 हजार 653 उंदीर मारण्यात आले असून सर्वाधिक जास्त 23 हजार 612 उंदीर बी विभागात मारण्यात आले आहेत. शहरात उंदीर मारण्याची जोरदार मोहिम सुरु असताना मात्र उपनगरात उंदीर मारण्यासाठी पालिकेला एकही माणूस किंवा संस्था मिळत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने एक उंदीर मारण्याचे 10 रुपये घोषित केले आहेत. तरीही अद्याप कुठल्याही संस्थेने उंदीर मारण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.

जर 5 महिन्यात मुंबई शहरात 93 हजार उंदीर मारले जात असतील तर उपनगरात गेल्या कित्तेक वर्षात उंदीर मारलेच गेले नसल्याने ही संख्या लाखोच्या घरात असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. संस्था आणि व्यक्ती मिळत नसल्याचे कारण देत पालिकेने आपल्या जबाबदारी पासून हात झटकले आहेत. यामुले उपनगरातील नागरीकान यावार्षिही लेप्टोचा सामना करावा लागू शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages