मारहाण केल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवक पदाचा राजीनामा देइल - राजेंद्र सूर्यवंशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मारहाण केल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवक पदाचा राजीनामा देइल - राजेंद्र सूर्यवंशी

Share This
मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या दादर येथील जी नॉर्थ वॉर्डात सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात दुय्यम अभियंता वनारसे यांना शिवसेना  नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी यांच्याकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ अभियंतानी एक दिवसीय बंद पुकारला होता. पण प्रत्यक्षात  आपण मारहाण केलेली नाही. जर मारहाण झाल्याची घटना स्पष्ट झाली तर मी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईल, असे सुर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.


महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डात दुय्यम अभियंता वनारसे यांना मारहण झाल्याची घटना घडली होती. ही घटना सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या कार्यालयात 18 मे रोजी घडली होती. मारहाण शिवसेना नगरसेवक सुर्यवंशी यांच्याकडून करण्यात आली  असा आरोप वनारसे यांनी करुन याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर जी नॉर्थ कार्यालय एक दिवसासाठी बंद करण्याची भूमिका येथील कर्मचारी आणि अभियंतानी घेत संबंधित प्रकरणात आयुक्तांनी काठोर भूमिका घ्यावी अशी मागणी अभियंताच्या संयुक्त कमिटीने केली होती.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक सुर्यवंशी स्वतहुन शिवजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना संबंधित प्रकरणात जामीन  मिळाला आहे. त्यानंतर सुर्यवंशी यांनी सहाय्यक आयुक्त बिरादार यांच्याकडे 24 मे रोजी पत्र लिहून 18 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादावादीच्या प्रसंगाचे सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे. पण मागणी करु नही त्यांना सीसीटीव्हीचे फुटेज देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपण सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. आपण कोणालाही मारहाण केलेली नाही. नालेसफाईच्या प्रश्नावरुन वादावादी झाली होती. पण  कोणालाही मी मारहाण केलेली नाही, हे सिध्द होण्यासाठी आपण सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये  सिध्द होईल, की नेमके काय घडले, त्यामुळे जर आपण कोणाला मारहाण केली असेल, हे सिध्द झाले तर मी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईल, असे सुर्यवंशी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages