मुंबई दि 22 - रिपब्लिकन पक्षाच्या मायनॉरिटी विंग चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस एम खान यांच्यावर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी रिपाइंच्या मायनॉरिटी विंगच्या पदाधिकारी नियुक्ती चे अधिकार दिले आहे या बाबतचे अधिकृत पत्र नुकतेच खासदार रामदास आठवले यांनी एस एम खान यांना प्रदान केले पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान करतेवेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मायनॉरिटी विंगचे कार्याध्यक्ष फिरोझ अली फारुखी पूर्व उत्तर प्रदेश चे निरीक्षक आर असर मौर्या हसन शेख आदी मान्यवर उपस्थित होते
रिपाइंचे मायनॉरिटी विंगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस एम खान यांना उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम उत्तर प्रदेश च्या प्रभारी पदाची जबाबदारी यापूर्वीच सोपविण्यात आली आहे रिपाइंच्या मायनॉरिटी विंगचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी नियुक्ती संबंधीचे अधिकार रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी एस एम खान यांना अधिकृतरित्या दिले आहेत खासदार रामदास आठवले यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल एस एम खान यांनी आभार मानले असून दाखविलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही दिलेली जबाबदारी विश्वासाने सर्व ताकदीने पार पाडू असा आत्मविश्वास एस एम खान यांनी व्यक्त केला
No comments:
Post a Comment