मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमामध्ये रामभरोसे कारभार सुरु असल्याची प्रचिती आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत आली आहे. बेस्टचे महा व्यवस्थापक सुट्टीवर गेले असून अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हैसूर येथे सेमिनारसाठी गेले असले तरी याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्षांना न दिल्याने समिती सदस्यांनी यावर खंत व्यक्त करत प्रशासकीय अधिकारी अध्यक्ष आणि समितीच्या बैठकीला गंभीर तेने घेत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, बेस्टचे दोन्ही बडे अधिकारी उपस्थित न राहील्याने त्यांच्या जागी उप महाव्यवस्थापक बैठकीत उपस्थित राहील्याने यावर नाराजी व्यक्त करत कॉंगे्रस, राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि मनसेच्या सदस्यांनी सभात्याग केला. याचवेळी कोरम पुर्ण होत नसल्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांना फोन करुन बैठकीत उपस्थित राहण्याची विनंती करण्याची वेळ अध्यक्षांवर आली.
बेस्ट समितीच्या आजच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेळेवर हजेरी लावत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यास तयार होते. यावेळी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे केवळ चारच सदस्य उपस्थित होते. मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी महा व्यवस्थापक आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक नसताना बैठकीत प्रशासनाकडून योग्य उत्तरे दिली जात नाही. त्यामुळे या दोघा अधिकार्यांच्या गैर हजेरीत उप महाव्यवस्थापकांना बसवून बैठक चालविणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, महाव्यवस्थापकांनी सुट्टी घेतल्यावर याबाबत बेस्ट समिती अध्यक्षांना सांगणे आवश्यक होते. तसेच बेस्ट समितीची बैठक अस तानाच अतिरिक्त महाव्यवस्थापक ही गैर हजर राहणे म्हणजे अध्यक्षांचा अपमान असून प्रशासन बेस्ट समितीच्या बैठकीला गंभीर तेने घेत नसल्याची प्र्रतिक्रिया करत कॉंगे्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
विशेष म्हणजे, महाव्यवस्थापकांनी सुट्टी घेतल्यावर याबाबत बेस्ट समिती अध्यक्षांना सांगणे आवश्यक होते. तसेच बेस्ट समितीची बैठक अस तानाच अतिरिक्त महाव्यवस्थापक ही गैर हजर राहणे म्हणजे अध्यक्षांचा अपमान असून प्रशासन बेस्ट समितीच्या बैठकीला गंभीर तेने घेत नसल्याची प्र्रतिक्रिया करत कॉंगे्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
यांनतर कोरम पुर्ण होण्यासाठी अध्यक्ष मिठबावकर यांनाच फोन करुन शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांना बोलवण्याची वेळ आली. पण सदस्य उपस्थित राहील्यावर पुन्हा उप महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले. अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी उप महाव्यवस्थापकांना बैठकीस हजर राहण्यास सांगितले असले तरी कुंदन यांनाच बैठकीसाठी बोलविण्यात यावे, तरच बैठक सुरु करा, अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त कुंदन या आल्यानंतर बेस्ट समितीची बैठक पुढे सुरु झाली
No comments:
Post a Comment