राज्यात 1 ते 15 ऑगस्टदरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात 1 ते 15 ऑगस्टदरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविणार

Share This
मुंबईदि30 : राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमापंधरवडा राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचेमंत्री महादेव जानकर  राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवाड्याचेआयोजन करण्यात येणार असूनशेतकऱ्यांसाठी या योजनेचा फार मोठालाभ होणार आहेया योजनेंतर्गत देशीसंकरीत (गायी,म्हशी), पाळीवपशु (घोडेगाढववळूबैल  रेडेतसेचशेळ्यामेंढ्या यांचा समावेशकरण्यात येणार आहेया योजनेंतर्गत यापुढे मृत्यूमुखी पडणाऱ्यापशुधनासाठी विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.
योजनेंतर्गत लाभ देणेसाठी जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रतिकुटुंब 5 गाय, म्हशी या मोठ्या जनावरांचा अथवा  50 शेळ्यामेंढ्या,डुकरेससे यांचा समावेश आहेविमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्षकिंमतीवर आधारित असतेजनावरांची किंमत ही वयस्वास्थ्य  दुधउत्पादनांवर पशुपालकपशुवैद्यकीय अधिकारी  विमा प्रतिनिधीयांच्यामार्फत निश्चित करण्यात येतेविमा रक्कमेच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनातर्फे भरण्यात येईल. उर्वरित 50 टक्के  रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे.  दारिद्र्यरेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 70 टक्के पर्यंत शासनातर्फे अनुदान देण्यात येईल.  उर्वरित 30 टक्के  रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील लाभार्थ्यांना 10 टक्के अधिकचे अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी न्यूइंडिया एश्योरन्स कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages