मुंबईतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी बृहत् आराखडा तयार करा - सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी बृहत् आराखडा तयार करा - सुभाष देसाई

Share This
मुंबई  : मुंबई शहरातील लोकसंख्येनुसार कोणत्या विभागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहेत्याचा तपशीलही त्वरित सादर करावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी त्याचा बृहत् आराखडा तयार करण्यात यावाअसे निर्देश उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले.

            
स्वाईन फ्ल्यूडेंग्यूमलेरियाइतर साथरोग किंवा तत्सम  संसर्गजन्य रोगांवर आळा बसविण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य सेवा संस्था व खाजगी रूग्णालये यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी गठितजिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची आज मंत्रालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालीत्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस आमदार अजय चौधरीमुंबई शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी,पोलीस उपायुक्त अश्विनी सानपजे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहानेबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसरकरराज्य वीज वितरणचे अधिक्षक अभियंता आर.जे. थुलसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जवंजाळ आदींसह  अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
            
देसाई म्हणालेपावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांवर आळा बसावा,  तसेच लोकांचे आरोग्य चांगले रहावेयादृष्टीने मुंबई जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे लक्ष्य असायला हवे आणि यासंदर्भात पाठपुरावा करून तातडीने कार्यवाही करावी. मुंबई शहरामधील प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर अभियान राबविण्यात यावे. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रबोधन तसेच प्राथमिक उपचार केले जावे. स्वच्छता असेल तरच आरोग्य चांगले राहील. यासाठी स्वच्छ मुंबई हे अभियानही राबविण्यात यावे. मुंबईत अनेक ठिकाणी शौचकूप नाहीत. यासंदर्भात सामाजिक संस्था कार्य करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेने त्यांना योग्य ते सहकार्य करावे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी साथीचे आजाराचे रूग्ण कमी आहेत. तसेच साथीचे आजार पसरू नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाचा अहवाल डॉ. केसरकर यांनी यावेळी सादर केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages