राज्य अनुदान समितीच्या अशासकीय सदस्यपदी रफीक शेख यांची नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य अनुदान समितीच्या अशासकीय सदस्यपदी रफीक शेख यांची नियुक्ती

Share This
मुंबई दि 18 : अल्पसंख्याक समाजाच्या संस्था/ शाळांसाठी पायाभूत सुविधा विकास योजना व मदरसामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी राज्य अनुदान समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी वेंगुर्ल्याचे रफीक शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


यापूर्वी या समितीच्या अशासकीय सदस्यपदी सैय्यद नवीदुजम्मा सय्यद फकरुज्जमा दारुम अलूम बीड या अशासकीय सदस्याची नेमणूक करण्यात आली होती. ही नेमणूक रद्द करण्यात आली असून या अशासकीय रिक्त पदी नवीन अशासकीय सदस्याची नेमणूक करण्यात आली आहे. या शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 201607181547479021 असा आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages