महापौर आणि आयुक्तांना भेटून खड्ड्यांची माहिती सादर करणार - खासदार किरीट सोमय्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौर आणि आयुक्तांना भेटून खड्ड्यांची माहिती सादर करणार - खासदार किरीट सोमय्या

Share This
मुंबई / प्रतिनिधी 9 July 2016 - मुंबईमध्ये पावसाळयात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पालिकेने खड्ड्यांचे जे आकडे जाहीर केले आहेत ते खोटे आहेत. रस्त्यावर किती खड्डे आहेत, ते कश्या प्रकारे बुजवले जात आहेत याची नेमकी माहिती ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या महापौर आणि आयुक्त यांची १२ जुलैला भेट घेऊन देणार आहेत. 

खासदार सोमय्या यांनी नुकताच मुलुंड ते घाटकोपर येथील एलबीएस रोड ची पाहणी केली. या पाहणीत एक खड्डा बुजवायला १० हजार रुपये लागत असताना ५० रुपयांची मलमपट्टी लावून खड्डे बुजवले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. संन २०१२ मध्ये २३ हजार १५० खड्डे बुजवण्यासाठी ४४.२२ कोटी रुपये. सन २०१३ मध्ये ३७ हजर ३२३ खड्डे बुजवण्यासाठी ४६.२६ कोटी रुपये, संन २०१४ मध्ये १४ हजार ७६ खड्डे बुजवण्यासाठी ३४.१७ कोटी, संन २०१५ मध्ये ६०४८ खड्डे बुजवण्यासाठी १०.४७ कोटी तर संन २०१६ मध्ये ३२० खड्डे बुजवण्यात आले असून यावर्षी ४७ कोटी रुपये मंजूर असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. गेल्या ५ वर्षात खड्डे बुजवणायसाठी पालिकेने १८२ कोटी रुपये खर्च केले असले तरी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय सोमय्या यांना आहे. यामुळे सोमय्या यांनी रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी भेट देऊन तेथील कामाची पाहणी करताना तेथील फोटो आणि व्हिडीओ क्लिप तयार केली आहे. फोटो आणि व्हिडीओ क्लिप १२ जुलैला महापौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांचीही भेट घेऊन सादर करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages