नरसिंग यादव निर्दोष असून त्यास माझा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नरसिंग यादव निर्दोष असून त्यास माझा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम

Share This
कुस्तीगर नरसिंग यादव महाराष्ट्राची शान असून तो उत्तेजक द्रव्यचाचणीत दोषी आढळलेल या गोष्टीवर विश्वास बसत नाही, नरसिंग यादव निर्दोष आहे, त्याला फसवण्यात आले आहे, मी त्याला अनेक वर्षा पासून ओळखतो तो दुध, दही, लस्सी पिणारा असून त्याला वाइट सवय नाही आहेत, यामागे कोणीतरी षडयंत्र रचिले आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले 

 
कुस्तीगर नरसिंग यादवच्या विरोधात कट रचण्यात आलेला आहे, उत्तर भारतात कुस्तीबाबत जे राजकारण चाललेले आहे, ज्याप्रमाणे एका गटाने कुस्तीवर ताबा ठेवला आहे त्यात नरसिंग यादवचा बळी गेला आहे. उत्तेजक द्रव्यचाचणीत नरसिंग यादव अणि त्याचा रूम पार्टनर दोघांना फेल केल आहे, मी WFI ला अपील करतो की, त्यानी नाड़ा मध्ये जावे आणि या प्रकरणाची शहानिशा करावी, कारण हा भारताच्या स्वाभिमानचा प्रश्न आहे, असे निरुपम म्हणाले.
 
नरसिंग यादव फॉर्म मध्ये असून तो हिन्दुस्तानचा सर्वोत्तम पहलवान आहे, ऑलम्पिक मध्ये भारताचे प्रतिनधित्व कोण करणार या वादातून तो जिंकला होतामला विश्वास आहे तो ओलम्पिक पदक जिंकून येईल, मी महाराष्ट्रातील जनतेकड़ूंन, महाराष्ट्र कुश्ती सघटनेकडून भारत सरकारला विनंती करतो की, याची चौकशी करावी आणि नरसिंग यादवला मुक्त पणे खेळू द्यावेअसे निरुपम म्हणाले.  
 
सदरप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत कुस्तीगर नरसिंग यादवचा भाऊ विनोद यादव, मुंबई उपनगर तालिम महासंघाचे पदाधिकारी भरत यादव, दिलीप पवार, मुन्ना पांडे आणि कपिल साळुंके उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages