नायर रुग्णालयात 'जागतिक मस्तिष्क व घसा कर्करोग दिन' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर रुग्णालयात 'जागतिक मस्तिष्क व घसा कर्करोग दिन'

Share This
मुंबई दिनांक २६ जुलै२०१६ - बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै रोजी साजऱया होणाऱया 'जागतिक मस्तिष्क व घसा कर्करोग दिनचे औचित्य साधून आज (दिनांक २६ जुलै२०१६समारंभ आयोजित करण्यात आला.


या समारंभास प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया विभागप्रमुखजगप्रसिद्ध कर्करोतज्ज्ञ डॉसुलतान प्रधान, महापालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी वैद्यकीय संचालक डॉसंजय ओक यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडलायावेळी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉरमेश भारमलकाननाकघसा विभागाच्या प्रमुख प्राडॉबची हाथिराम व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रिन्स अली खान रुग्णालय यांनी सार्वजनिक – खासगी सहभाग (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपतत्त्वावर फेब्रुवारी २००८ मध्ये मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार कार्यक्रम हाती घेतलायामध्ये प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया विभागप्रमुखजगप्रसिद्ध कर्करोतज्ज्ञ डॉसुलतान प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली नायर धर्मादाय रुग्णालयातील काननाक व घसा विभागाचे वैद्यकीय अधिकारी,प्राध्यापकनिवासी वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना कर्करोग उपचारांकरीता प्रशिक्षित करण्यात आलेसमवेत नायर रुग्णालयातील विद्यमान काननाकघसा उपचार विभाग हे मस्तिष्क व घसा कर्करोग उपचारांकरीता सुसज्ज करण्याचेही उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले.

गतवर्षी बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात मस्तिष्क व घसा कर्करोग उपचारांकरीता अद्ययावत संयंत्रे आणि सर्व सुविधांसह सुसज्ज असा विभाग नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट यांनी दान केलात्याकरीता संपूर्ण आर्थिक व अनुषांगिक सहाय्य त्यांनी पुरविलेयामुळे काननाकघसा उपचार विभागाला संलग्न असा मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार विभाग उभारणे शक्य झाले असून याठिकाणी निदान ते सर्वंकष उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेतया मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार विभागाचा आजवर सुमारे १५०० रुग्णांना लाभ झाला आहेकाननाकघसा विभागाच्या प्रमुख प्राडॉबची हाथिराम आणि सहाय्यक प्राध्यापक डॉविकी खट्टर यांच्या मार्गदर्शनाने हा विभाग कार्यान्वित झाला आहे.

नायर रुग्णालयात रेडिएशनमेडिकल ओंकोलॉजी या सुविधांसह फिजिओथेरपीऑक्युपेशनल थेरपीरिहॅबिलीटेशन या सर्व सुविधा देखील उपलब्ध आहेतयामुळे मस्तिष्क व घसा कर्करोग रुग्णांना आता नायर रुग्णालयात सर्वंकष उपचार, ते ही विनामूल्य उपलब्ध होत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages