शासन परवानगीशिवाय एकनाथ खडसेचा रामटेक बंगल्यात बेकायदेशीर वास्तव्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शासन परवानगीशिवाय एकनाथ खडसेचा रामटेक बंगल्यात बेकायदेशीर वास्तव्य

Share This
मुंबई / प्रतिनिधी
नैतिकतेचा दावा करत मंत्री पदाचा राजीनामा देणारे भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे आजही मलबार हिल येथील रामटेक बंगल्यात राहत आहेत. शासन परवानगीशिवाय एकनाथ खडसेचा बंगल्यात वास्तव्य असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या 2 बंगल्याची माहिती विचारली होती. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी शि.म.धुळे यांनी अनिल गलगली यांस कळविले की एकनाथ खडसे, माजी मंत्री यांच्या ताब्यात एकच रामटेक बंगला असून तो त्यांनी अद्याप रिक्त केलेला नाही. खडसे यांना शासकीय निवासस्थान मुदतवाढीसाठी परवानगी दिलेली नाही.

रामटेक बंगला दिनांक 19 नोव्हेंबर 2014 रोजी खडसे यांस दिला होता ज्याचे क्षेत्रफळ 8857 चौरस फुट आहे. शि.म.धुळे यांनी अनिल गलगली यांस दिनांक 1 मार्च 2014 चा शासन निर्णयाची प्रत दिली ज्यात मंत्री पदावरुन पदमुक्त झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत शासकीय निवासस्थान शासनाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे तर शासनाच्या परवानगीने पुढील 3 महिने राहिल्यास रु 25/- प्रति चौरस फूट दरमहा भाडे व अंतर्गत सुविधांसाठी पूर्ण आकार वसूल केला जातो पण खडसे यांस कोणतीही परवानगी शासनाने दिली नसल्यामुळे ते बेकायदेशीर वास्तव्य करत आहे.

दिनांक 4 जून 2016 रोजी राजीनामा दिल्यानंतर 19 जून 2016 रोजी बंगला रिक्त करणे आवश्यक होते. शासनाने एकनाथ खडसेवर केलेली मेहरबानी चुकीची असून परवानगी नसताना बेकायदेशीर वास्तव्य करणा-या खडसेवर कारवाई करत बंगला रिक्त करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्य शासनातील कर्मचा-यांचे निवासस्थान ताबडतोब रिक्त करणारे अधिकारी एकनाथ खडसे सारख्या माजी मंत्र्यांच्या बाबतीत सौम्यता बाळगत असल्याबद्दल अनिल गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages