मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत सध्या रस्ते घोटाळा गाजत असून या प्रकरणी 10 खाजगी लेखापाल, कंत्राटदाराकड़े काम करणाऱ्या 12 अभियंत्यासह रस्ते विभागाचे मुख्य अभियंता अशोक पवार व मुख्य दक्षता अधिकारी उदय मुरुडकर याना अटक केली आहे. प्रशासनाने पवार व मुरुडकर याना आरोपपत्र न ठेवता अटक केल्याने महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.
रोडवर घेतले गेलेले निरिक्षण आयआरसीच्या मानकाप्रमाणे घेण्यात आलेले नाही, प्रत्तेक रस्त्यावर एक किंवा दोनच खड्डे घेवुन प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलेले बरोबर असले तरी त्या आधारे कामामधे त्रुटी राहिल्या आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. बहुतांश प्रकरणात अदा केलेली रक्कम ही 1 टक्यापेक्षा कमी आहे. यासंदर्भात कामांची मोजमापे व् देयके अंतिम झालेली नाहित. पालिकेचे या प्रकरणात 1 टक्क्यापेक्षाही कमी नुकसान झालेले आहे.
स्ट्याक कमिटीच्या 45 व्या बैठकीत महापालिकच्या अभियंत्याची जबाबदारी निश्चित केलेली नाही. अशी जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही परिपत्रक काढले नसताना अभियंत्याना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगत अभियंत्यांनी आझाद मैदानात निदर्शने केली. अभियंत्यांचे आंदोलन असताना पालिका आयुक्त परदेशात असल्याने भेटू शकलेले नाहित. तसेच पालिकेतील एकाही बड्या अधीकाऱ्याने आंदोलनकर्त्याना भेट दिलेले नाही.

No comments:
Post a Comment