खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आमदार नितेश राणे यांची मोहिम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आमदार नितेश राणे यांची मोहिम

Share This
मुंबईप्रतिनिधी,
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुझवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मुंबई महापालिकेतर्फे खर्च केला जातो मात्र त्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे काही कमी होत नाहीतउलट मुंबईत रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेतहेच कळत नाही. मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना भाजपने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहेत्यामुळे मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणिव व्हावी यासाठी कॉंग्रसचे युवा आमदार नितेश राणे यांनी आज मुंबईतील खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघात  आयोजित केले होते. मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई’ या नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. राणे यांच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतलेल्या साडे चारशे हून अधिक खड्ड्यांची छायाचित्रे यावेळी प्रदर्शित करण्यात आली.  


मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रविण छेडामाजी खासदार डॉ नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांनी केले. पालिका प्रशासनाने मुंबईत केवळ सहासठ्ठ खड्डे असल्याचा निलाजरा दावा केला होतामात्र आमच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांचा शोध घेतल्यावर एका दिवसात तब्बल साडे चारशे खड्डे असल्याचे समोर आले. मुंबई पालिकेचे प्रशासनआयुक्तव सत्ताधारी याबाबत मुंबईकरांना फसवत असून मुंबईकरांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाहीअसे आमदार राणे म्हणाले. 

मुंबई महापालिकेतील शिवसेना व भाजपचे सत्ताधारी एकमेकांशी भांडण्याचे नाटक करत असून  नागरिकांची दिशाभूल करण्याचा सेना भाजपचा हा प्रयत्न आहे. मात्र मुंबईकरांनी निष्क्रिय शिवसेना व भाजपला धडा शिकवावा व येत्या महापालिका निवडणूकीत चांगले काम करणाऱ्या कॉंग्रेसला साथ द्यावी असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. 
  
मुंबईत नेमके किती खड्डे आहेतयाचा शोध आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून मुंबईतील विविध विभागांमध्ये असलेल्या खड्ड्यांची छायाचित्रे काढण्यात आली असून त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनाही देण्यात आले होते,  मात्र ते काही प्रदर्शनाकडे फिरकले नाहीत.  

मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत व खड्ड्यांबाबत आमदार राणे म्हणालेमुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्यावर पसरले आहेमात्र या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याकडे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व भाजपचे अजिबात लक्ष नाही. सेना भाजपचे नेते एकमेकांशी भांडण्याचे नाटक करुन मुंबईकरांचा विश्वासघात करत असून मुंबईकरांच्या करातील कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते दुरुस्ती खर्च होऊनही खड्डेमुक्त रस्ते नागरिकांना मिळत नाहीत. मुंबईकरांनी शिवसेना भाजपच्या या निष्क्रिय कामगिरीची  दखल येत्या महापालिकेच्या निवडणूकीत घ्यावी व मुंबईला शिवसेना भाजप मु्क्त बनवावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. 

हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरस्थायी समिती अध्यक्षसभागृह नेताभाजपचे महापालिकेतील प्रमुख नेतेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक या सर्वांच्या प्रभागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मात्र एकमेकांशी लुटुपुटुची लढाई करण्यात मग्न असलेल्या शिवसेना भाजपच्या नेत्यांना त्याची काही फिकीर पडलेली नाही. मुंबई महापालिकेची सत्ता इतकी वर्षे हातात असताना  ही परिस्थिती बदलण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाहीत्यामुळे नागरिकांनी येत्या निवडणूकीत चांगले काम करणाऱ्या व खड्डेमुक्त रस्ते करणाऱ्या कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवसेना व भाजपच्या नेत्यांचे खरे रुप समोर आणण्याचा प्रयत्न आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून केल्याचे राणे म्हणाले. 

आमदार राणे यांनी एक जुलै रोजी सांताक्रुझ पश्चिम येथील रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये चक्क वृक्षारोपण करुन महापालिका प्रशासनाचे व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages