ताडोबातील वाघांच्‍या छायाचित्रावर आधारित टपाल तिकीट - केंद्र शासनाचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ताडोबातील वाघांच्‍या छायाचित्रावर आधारित टपाल तिकीट - केंद्र शासनाचा निर्णय

Share This
जागतिक व्‍याघ्रदिनी टपाल तिकीट होणार प्रकाशित
मुंबई, दि. 27 : चंद्रपूर जिल्‍ह्यातील जगप्रसिध्‍द ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पातील वाघाचे छायाचित्र असलेल्‍या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्‍याचा निर्णय केंद्र सरकारच्‍या डाक विभागाने घेतला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळत आहे. येत्‍या 29 जुलै रोजी जागतिक व्‍याघ्र दिनाचे औचित्‍य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यात येणार आहे.
ताडोबाच्‍या जंगलातील एक वाघिण आपल्‍या मुलावर माया करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्‍या अमोल बैस या तरूण हौशी वन्‍यजीव छायाचित्रकाराने आपल्‍या कॅमे-या‍च्‍या सहाय्याने टिपले. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्‍व लक्षात घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्‍हावे व ताडोबाचे व्‍याघ्र वैभव जगाच्‍या पाठीवर अधोरेखित व्‍हावे यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. यासाठी त्‍यांनी केंद्रीय विधी आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्‍यक्ष भेटून विनंती केली. या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्‍याचे महत्‍व व तेथील व्‍याघ्र वैभवाचा सविस्‍तर तपशील त्‍यांनी केंद्रीय विधी आणि न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना सादर केला. या मागणीचा पाठपुरावा करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 29 जुलै रोजी जागतिक व्‍याघ्र दिनाचे औचित्‍य साधून टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असुन केंद्र सरकारने हे टपाल तिकीट प्रकाशित करण्‍याचा निर्णय आहे. आता  जागतिक व्‍याघ्र दिनी 29 जुलै रोजी हे टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages