अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा - सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा - सुधीर मुनगंटीवार

Share This
मुंबई, दि. 26 : राज्यातील अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मागणीच्या प्रस्तावासह इतर विभागातील वेतनश्रेणीची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात आयोजित अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मागणीबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार रामनाथ मोते उपस्थित होते.

वित्तमंत्री म्हणाले की, अनुदानित वसतीगृहाच्या कामगिरीचे मूल्यमापन होणे आवश्यक असून त्यासाठी आमदारांची समिती गठीत करण्यात यावी. ही समिती राज्यातील अनुदानित वसतीगृहांची तपासणी करेल. तसेच वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठी थर्ड पार्टी इन्सपेक्शन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वसतीगृहातील विद्यार्थ्यांकडून माहिती भरुन घेऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages