डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन प्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन प्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश

Share This
आमदार अॅड. आशिष शेलार आणि आमदार विजय भाई गिरकर यांच्या मागणीवर दिले निर्देश
मुंबई दि. १९ (प्रतिनिधी) – भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे उभारलेले भवन धोकादायक ठरवून ते पडण्याचे परवानगी देणे नव्या इमारतीला परवानगी देणे इंटेनशन फॉर डेव्हलपमेंट ला परवानगी देणे या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालिका आयुक्तांना दिले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ही आज मागणी केली.

दादर येथील महामानव भारतत्‍न परमपुज्‍य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाला काल संध्‍याकाळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी भेट दिली. त्‍यांनी वास्‍तुची पाह‍णी केली तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्‍यक्ष आनंदाराज आंबडेकर यांच्‍याशी संवादही साधला. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली  



याबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणले की,  महामानव भारतत्‍न परमपुज्‍य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या सर्व वास्‍तुंचे जनतच झाले पाहिजे अशीच भूमिका सरकार आणि भाजपाची आहे. दादर येथील या पवित्र वास्‍तूलाही  ऐतिहासिक वारसा वास्‍तु म्‍हणून घोषीत करून महापालिकेने जतन करण्‍याची गरज होती. पण संपुर्ण वास्‍तुला 354 ची नोटीस बजावून ती धोकादायक इमारतीच्‍या सी 1 दर्जामध्‍ये टाकण्‍यात आली तसेच नव्या इमातीचा आराखडा मंजूर करण्यात आला. इंटेनशन फॉर डेव्हलपमेंट ला परवानगी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशी चे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages