आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त टायगर रॉकचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त टायगर रॉकचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

Share This
नागपूरदि.29 :  आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित टायगर रॉकचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास राज्यमंत्री  अम्ब्रीशराव अत्राम, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सिव्हिल लाईन्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत लोढा, नगरसेविका  प्रगती पाटील, विकास ठाकरे, तथास्तूचे  अनिल अग्रवाल, एसडीईएलचे अशोक अग्रवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, टायगर रॉकमुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. व्याघ्र संरक्षणातून पर्यावरणाला चालना  मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळेल. ताडोबा, पेंच, मेळघाट येथील पर्यटनाला अशा उपक्रमातून चालना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, नागपूर हे कॅपिटल ऑफ टायगर म्हणून देशभरात ओळखल्या जात आहे. टायगर रॉक मुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. व्याघ्र संरक्षणातून पर्यावरणाला चालना  मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळेल. ताडोबा, पेंच, मेळघाट येथील पर्यटनाला अशा उपक्रमातून चालना मिळणार आहे.
तथास्तू स्वयंसेवी संस्थेने टायगर रॉक प्रतिकृती तयार करुन नागपूर शहराच्या सौंदर्यात भर पाडली आहे. तसेच या प्रतिकृतीसाठी एसडीईएल ने 7 लक्ष रुपये खर्च केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages