अनु. जाती जमातीवरील अत्याचाराविरोधात आझाद मैदानात आज (11 जुलैला) निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनु. जाती जमातीवरील अत्याचाराविरोधात आझाद मैदानात आज (11 जुलैला) निदर्शने

Share This
मुंबई / प्रतिनिधी 11 Aug 2016  - जातीय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने देशभर सुरु असलेल्या अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचाराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात 11 जुलै रोजी दुपारी 2 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भरत सोलंकी यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोलंकी बोलत होते. यावेळी सोलंकी यांच्यासोबत दीपक गायकवाड व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुजरात उना येथे झालेल्या जातीय अत्याचाराची सिबिआय चौकशी करावी, थानगढ़ ( सुरेंद्र नगर ) येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपीना त्वरित अटक करावी, अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अत्याचाराच्या नोंदणीसाठी टोलफ्री नंबर उपलबध करून द्यावा, देशभर गोरक्षणाच्या नावावर सुरु असलेली गुंडगिरी त्वरित थांबवून दोषींवर कारवाई करावी, पारंपारिक हीं दर्जाची कामे सोडणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना ५ एकर जमीन देऊन पुनर्वसन करावे, सरकारी निम सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, न्याय पालिकेत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व का देण्यात येत नाही याची संसदीय चौकशी करावी, जात प्रमाणपत्रासाठीची १९५० ची अट रद्द करून सध्याच्या वास्तव्याच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अनुसूचित जाती जमातीच्या बजेटची रक्कम इतरत्र वळवू नये असे झाल्यास संबंधितांवर ऍट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages