स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

Share This
मुंबई : विधान भवन येथे स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या  प्रसंगी विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे व विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे तसेच विधानसमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के.चव्हाण, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विशेष कार्य अधिकारी सुभाषचंद्र मयेकर, उप सचिव शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, विधान सभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सोमनाथ  सानप, रवींद्र जगदाळे, प्रकाशचंद्र खोंदले, सुनिल झोरे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखालीली पथकाने यावेळी मानवंदना दिली.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages