शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विधान भवानस भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विधान भवानस भेट

Share This
मुंबई. ( प्रतिनिधी ) – येथील शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्याच्या विधान भवानाला भेट देऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे निरीक्षण केले. अभ्यासक्रमातील पाठ्यघटकांचा अभ्यास प्रत्यक्ष निरीक्षणातून करण्याचा प्रयत्न अध्ययन अध्यापन प्रक्रियेत होणे आवश्यक आहे. त्याच विचारातून महाविद्यालय नियमितपणे विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या कामकाजाच्या निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देत असते. प्रस्तुत भेट हि महाविद्यालयाची विधान भवनाला दिलेली चौथी भेट आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा एक उत्कृष्ठ अनुभव होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शिक्षणाच्या दर्जा बद्दल कधी नव्हती इतकी सजगता सध्या वाढली आहे. पोपटपंछी करून फक्त परीक्षेपुरता चांगले गुण मिळवण्याऱ्यांची प्रत्यक्षात कशी फजिती होते यावर अनेक जाहिराती सुद्धा प्रचलित आहेत. दर्जेदार शिक्षण हे रचनात्मक असले पाहिजे हे अनेक शिक्षण तज्ञांनी प्रतिपादन करून ठेवले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुद्धा याचा पुरस्कार करण्याने आला आहे. याचा आधार घेऊनच अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय करत असते असे प्राचार्य डॉ. विष्णू यादव म्हणाले. या संबंधी अधिक माहिती देताना विषय शिक्षक निमेश पाटील म्हणाले, अभ्यासातील संकल्पना नीटपणे समजून घेण्यासाठी योग्य तेथे क्षेत्र भेट आयोजित करणे आवश्यक असते. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना हे साधता येते. विधिमंडळ सचिवालया कडून जरी विद्यार्थ्यांना दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी प्रत्येकी एक तासाचा वेळ उपलब्ध करून दिला जात असला तरी, यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक होते. महाविद्यालयात यासाठी दरवर्षी विद्यार्थी संसदेचे आयोजन करण्यात येते. विध्यार्थी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेतून राज्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात. विधिमंडळाची रचना, कार्य आदी माहिती बरोबरच सध्याच्या राजकीय परिस्थिती बद्दल माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना पॉवर पॉईंट सादरीकरण द्वारे देण्यात आली होती. दोन्ही सभागृहातील सध्याच्या सद्यःस्यांची माहिती, सभागृहाच्या परंपरा याची माहिती सुद्धा यात होती, सभागृहातील आसन व्यवस्था कशी असते, अगदी कनिष्ठ सभागृहातील गालिचा हिरव्या रंगाचा आणि वरिष्ठ सभागृहात लाल रंगच का, अशी बारीकसारीक माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यामुळे प्रत्यक्ष निरीक्षण त्यांच्या साठी एक उत्कृष्ट अनुभव ठरला. आपल्या शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात लोकशाही व्यवस्था मजबूत आहे. मात्र त्यात सुद्धा अनेक त्रुटी आहेतच. राजकारण आणि एकूणच व्यवस्था याबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. समस्या खऱ्या असल्या आणि मोठ्या असल्या तरी त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. त्यासाठी हि व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न याचाच एक भाग होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages